6.काळ्या मातीचं गाणं
पिठुरल्या पुनवेत फुलारलं शेत,
मायेचं आभाळ कवेत घेत
दाण्या दाण्याचे करित मोती,
माझ्या शेतात काळी माती llधृll
लवलवते सुगीची नार
तिला सोसेना ज्वानीचा भार
उडे पदर पिसाट वारं
डूलं खुशीत सारं शिवार
जिवा-शिवाची जोडीते नाती,
माझ्या शेतात काळी माती ll१ll
माझ्या खळ्यात माझा घास
जोडी खिलारी माझी खास
माझ्या मळ्यात धानी सुवास
पान-तळ्यात संजीवन हास
पक्षी सुरात भलरी गाती,
माझ्या शेतात काळी माती ll२ll
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा