3.झेप
जेव्हा माणसाला झाली
उंच उडण्याची घाई
पंख हातांचे हालवी
पाय उदरात घेई
अशा घेतल्या भरा -या
झाला झाला तो पिसाट
चंद्र,सूर्य,ग्रह ,गोल
थरारले गगनात
भिती वाटली तयांना
धरेच्या या माकडाची
दिले बुद्धीचे कोलीत
मती फिरली देवाची
लुकलुक करणारे
सारे थरारले तारे
फुले आकाशाची
खुडून हा भरीलकी हारे
बुध ,गुरू ,शुक्र यांना
आता लागले ग्रहण
मोजमापे नेली त्यानं
आमचं रचिलं सरणं
मागे घाबरला होता
असा रजनीचा कांत
शनी, मंगळही केले
सहजची पादाक्रांत
भवितव्य माणसाचे
ठरवी राशी नक्षत्र
हा नक्षत्रांच्या भाळी
रेखी भविष्य विचित्र
या या पृथ्वीला केली
यानं उघडी बोडकी
लज्जा माणसाची जिने
रक्षियेली होती
लाजे चूरचूर झाली
बावरली सुर्यमाला
म्हणे हात नको लावू
बारे माझ्या पदराला
लाज राख आमची तू
होऊ नको अनावर
कृपा कर झेप
विनाशाची आवर आवर ........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा